17 January 2021

News Flash

पुणे: बंद खोलीत मृतदेह सापडल्याने खळबळ

हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त

प्रातिनिधिक

आयटी हब हिंजवडी परिसरात एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा बंद खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून संबंधित व्यक्तीची हत्या झाली असल्याची शक्यता हिंजवडी पोलिसांनी वर्तवली आहे. गणपत सदाशिव सांगळे (२५) रा. कळंब, इंदापूर असे मृत्यू झालेल्या व्यक्ती नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळी दहाच्या सुमारास नियंत्रण कक्षाला हिंजवडी येथून एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याचा फोन आला. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद खोलीचे कुलूप तोडून आत पाहिले असता सडलेल्या अवस्थेत गणपत सदाशिव सांगळे याचा मृतदेह आढळला. तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे”.

गणपत सदाशिव सांगळे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून तो हिंजवडीमधील जांबे गावच्या हद्दीत भाड्याने खोली घेऊन राहत होते. सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. मात्र, त्यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर सर्व स्पष्ट होईल. हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 3:40 pm

Web Title: a dead body found in pune kjp 91 sgy 87
Next Stories
1 मराठीविषयक मंडळांना पुनर्रचनेची प्रतीक्षाच
2 ‘स्वाध्याय’मधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे निर्देश
3 सवलत शंभर कोटींची, उत्पन्न २२० कोटी
Just Now!
X