24 April 2019

News Flash

पुणे : भवानी पेठेत फायबरच्या कारखान्याला भीषण आग, ८ टँकर घटनास्थळी

८ टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या काही घरांना या आगीची झळ बसली आहे.

पुणे : भवानी पेठेतील एका फायबरच्या कारखान्याला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली.

पुण्यातील भवानी पेठेत एका फायबरच्या कारखान्याला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीची झळ कारखान्याच्या बाजूला असलेल्या काही घरांनाही बसली आहे. अद्याप या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, अशी माहिती अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अग्निशामक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भवानी पेठेतील भवानी माता मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या गल्लीमध्ये हा फायबरचा कारखाना आहे. त्या कारखान्याला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ८ टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या काही घरांना या आगीची झळ बसली आहे. मात्र, या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on November 8, 2018 7:55 pm

Web Title: a fierce fire of fibre factory near bhawani peth at pune city 8 tanker at the sight