News Flash

पुणे : महिलादिनीच तरुणीची काढली छेड; आरोपीला महिलांकडून चोप

सराईत आरोपी पिंपरी पोलिसांकडून अटकेत

(संग्रहित छायाचित्र)

महिलादिनाच्या दिवशीच एका तरुणीची छेड काढण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. दरम्यान, संबंधित तरुणाला महिलांनी आणि नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पिंपरी पोलिसांच्या माहितीनुसार, हरीश शिवाजी धोत्रे (वय २४, रा. कामगार नगर) असे छेड काढणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी शिकवणी करून एक तरुणी रविवारी घरी जात असताना हा प्रकार घडला. दबा धरून बसलेल्या या सराईत गुन्हेगाराने १९ वर्षीय तरुणीला अचानक पाठीमागून मिठी मारली. घाबरलेल्या तरुणीने आरोपीचा प्रतिकार करीत आरडाओरडा केला. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक, नागरिक आणि महिला तत्काळ तिथे धाव घेतली. लोक गोळा झालेले पाहून आरोपी पळून जात असतानाच त्याला महिलांनी पकडले.

पकडल्यानंतर महिलांनी आणि नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना महिलादिनाच्या दिवशी रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 7:41 pm

Web Title: a girl molested by a youth at womens day in pimpri chinchwad aau 85 kjp 91
Next Stories
1 पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १२
2 Coronavirus : पुण्यातील आठ पैकी तीन पॉझिटिव्ह रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये
3 “करोनाग्रस्तांची नावं उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई”
Just Now!
X