पुण्यातील बिबवेवाडी येथील स्मशानभूमी जवळ सजावट साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागून संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील ओंकारनगर येथील त्रिमूर्ती या सजावटीच्या सामानाच्या गोडाऊनला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागली. या गोडाऊनमध्ये सजावट साहित्य असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. याबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आकाशात उचं धुराचे लोट जात होते. आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा करण्यात आल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2021 5:32 pm