अष्टपैलू लेखकाच्या १०१व्या जन्मदिवसानिमित्ताने वाचकांना भेट

पुणे : चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य यांसह विविध कलांमध्ये मुशाफिरी करणारे खेळीया आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या सर्व साहित्याची सूची आता संगणकाच्या एका ‘क्लिक’वर रसिकांना उपलब्ध होणार आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

यामध्ये पुलंनी लिहिलेली सर्व पुस्तके, पुलंवर लिहिली गेलेली पुस्तके, पुलंच्या साहित्याचे अन्य भाषांमध्ये झालेले अनुवाद याची इत्थंभूत माहिती पुलप्रेमींना संगणकावर सहजरीत्या उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकू र यांनी दिली. यातील तपशील वारंवार सुधारित करण्यात येणार आहेत.

जॉर्ज आणि हेलन पापाश्विली यांच्या ‘एनीथिंग कॅन हॅपन’ या साहित्यकृतीचा पुलंनी ‘काय वाट्टेल ते होईल’ या नावाने केलेल्या अनुवादाच्या नोंदीने ‘पुलंची पुस्तके’ या विभागाची सुरुवात होते. या विभागामध्ये १९४८ ते २००४ या कालावधीत पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या हयातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या ६० पुस्तकांचा आणि पुलंच्या निधनांनतर प्रकाशित झालेल्या सहा पुस्तकांचा समावेश आहे. ‘संकलित साहित्याची यादी’ या विभागामध्ये १९४८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘तुका म्हणे आता’ या नाटकापासून ते पुलंनी विविध ठिकाणी केलेल्या लेखनाच्या एक हजार ८९ नोंदी आहेत. ‘पुलंवर लिहिली गेलेली पुस्तके’ या विभागामध्ये पुलं या व्यक्तिमत्त्वाचा विविध लेखकांनी वेध घेतलेल्या ४२ पुस्तकांची सूची समाविष्ट आहे. पुलंच्या साहित्यकृतींचा गुजराती, हिंदूी, पंजाबी, तेलगू, कानडी, इंग्रजी, कोकणी आणि ओडिया या भाषांमध्ये अनुवाद  झाला आहे. ‘पुलंचे अन्य भाषांमध्ये झालेले अनुवाद’ या विभागामध्ये ४२ पुस्तकांच्या नोंदींचा समावेश आहे.

संकेतस्थळ विकसित करण्यासाठी उमा कुलकर्णी, अरुणा जडेजा, नागेश कांबळे, किरण भिडे, राम कोल्हटकर, सतीश जकातदार, उमेश ठाकूर, आदित्यकुमार परुळेकर यांचे सहकार्य लाभले असून प्रा. मििलद जोशी आणि वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सूचना केल्या, असे ठाकूर यांनी सांगितले.

 

अचूक नोंदी..

पु. ल. देशपांडे यांच्या १०१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारपासून (८ नोव्हेंबर) ही सूची रसिकांना
https://sites.google.com/view/pldeshpandebibliography या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ही सूची तयार करण्यासाठी पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकू र यांनी गेली काही वर्षे विशेष परिश्रम घेतले आहेत. यातील नोंदी अचूक होण्यासाठी सुनीताबाई देशपांडे, मधू गानू आणि श्री. पु. भागवत यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून घेण्यात आला आहे.