News Flash

पुण्यात सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळती; मॉलमधून ३०० जणांना बाहेर काढण्यात आलं

स्थानिकांना डोळे, कान, नाक घशात जळजळ होऊ लागल्यानंतर झाला खुलासा

फोटो सौजन्य: एएनआयवरुन साभार

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील फॅशन स्ट्रीटमध्ये आग लागुन ६०० हून अधिक दुकाने जळून खाक झाली. ही घटना ताजी असताना आज दुपारच्या सुमारास सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळतीची घटना घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली.

अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरवारे कॉलेजच्या बाजूला सेंट्रल मॉल आहे. तेथील लोकांना डोळे, कान,नाक आणि घशामध्ये जळजळ होण्याचा त्रास होऊ लागला. तसेच मॉलच्या पार्कींगमध्ये धूर झाल्याची माहिती सोमवारी (२९ मार्च २०२१ रोजी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेऊन पार्किंगमध्ये पाहणी केली. या पहाणीमध्ये पार्किंगच्या एका कोपऱ्यात गॅस सदृश्य वस्तु आढळून आली. या वस्तूमधून होणाऱ्या गॅस लिकेजमुळेच नागरिकांना त्रास होत असल्याचं स्पष्ट झालं.

या वस्तूवर पाणी मारण्याआधी मॉलमधील ३०० जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यात आला. यानंतर काहीवेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र ही वस्तू नक्की कुठून आली यासंदर्भातील तपास अद्याप सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही तासांनंतर हा मॉल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्यात आलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 4:09 pm

Web Title: a minor chemical leak reported in central mall parking near garware college in pune svk 88 scsg 91
Next Stories
1 ‘त्या’ भेटीत नेमकं काय झालं? चंद्रकांत पाटील म्हणतात….
2 पुणे हादरलं! तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन छातीत झाडली गोळी, मात्र मोबाईलमुळे बचावली
3 एक कोटी लोकांना पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा; भाजपाची मोठी मागणी
Just Now!
X