08 April 2020

News Flash

पुणे – भावाला मारून टाकेन अशी धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे

संग्रहित छायाचित्र

पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर भावाला जीवे मारुन टाकेन अशी धमकी देत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्रांतवाडी भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. तू माझ्याशी का बोलत नाहीस ? मी सांगेन तसे तू न केल्यास तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी आरोपी पीडित मुलीला देत होता. पीडित मुलगी अल्पवयीन असून आठवीत शिकत आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीत शिकत असून आपल्या आई, वडील आणि भावासोबत राहते. मुलीचे आई, वडील बुधवारी कामावर गेले होते. मुलगी शाळेत जाण्यास निघाली असता रस्त्यात आरोपी धनंजय मारमिलले याने तिला अडवले. तू माझ्याशी का बोलत नाहीस? मी सांगेन तसे तू न केल्यास तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी त्याने देण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपीने मुलीवर जबरदस्ती करत घरी नेले. यावेळी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तेथून पळून गेला. बराच वेळा मुलगी घरी न आल्याने पीडित मुलीच्या आईने तिला शोधण्यास सुरुवात केली. मुलगी सापडली असता आईने विश्वासात घेऊन काय झाले याबाबत विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. तसंच काही तासात आरोपीला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 1:42 pm

Web Title: a minor girl raped threaten to kill brother in pune sgy 87
Next Stories
1 पुणे : दारूड्या नवऱ्याला कंटाळल्याने मुलीला कीटकनाशक पाजून आईची आत्महत्या
2 ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’साठी प्रवेश अर्जाचे वितरण सुरू
3 इस्रोकडून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा
Just Now!
X