News Flash

पुणे- स्केटिंग प्रशिक्षकाची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेहाशेजारी आढळल्या बिअरच्या बाटल्या

हिंजवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात स्केटिंग प्रशिक्षकाची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश नाईक असे हत्या झालेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाशेजारी बिअरच्या बाटल्या सापडल्या आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मारुंजी परिसरातील मैदानात निलेश यांचा मृतदेह आढळला. शेजारीच कोलते पाटील ही सोसायटी आहे, तेथील सुरक्षा रक्षकाने हा मृतदेह पाहिल्यानंतर घटना उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, निलेश यांच्या गळ्यावर धारदार शास्त्राचे वार असल्याचे समोर आलं आहे. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी तीन बिअर बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृतदेह मैदानात आणून टाकला की सोबत असलेल्यांसोबत वाद होऊन संबंधित घटना घडली आहे याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. निलेश हे स्केटिंग प्रशिक्षक होते अशी माहिती मिळत आहे. हिंजवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 4:17 pm

Web Title: a murder in hinjwadi of pune sgy 87
Next Stories
1 स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने; पालिका सभागृहनेतापदी धीरज घाटे
2 महाविद्यालयांच्या नाटय़ विभागात उत्साह!
3 कांद्याला उच्चांकी दर
Just Now!
X