शहरातील विविध संस्था व संघटनांनी विशेष उपक्रमांचे आयोजन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. वृक्षारोपणासह रोपांचे वाटप आणि पर्यावरणविषयक स्पर्धाचाही यात समावेश होता.
‘आनंदवन मित्र मंडळ’ व वन विभागातर्फे खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, नंदा लोणकर यांच्या उपस्थितीत एनआयबीएम रस्त्यावरील आनंदवन परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘पक्ष्यांसाठी घरटी बनवा’ स्पर्धेच्या विजेत्यांचा कार्यक्रमस्थळी गौरव करण्यात आला. ‘आनंदवन’ परिसरातच ‘जय आनंद ग्रुप’ व पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने र्तीथकर विहार येथे २४ र्तीथकरांच्या नावे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्ष प्राधिकरण सदस्य डॉ. शंतनू जगदाळे, ग्रुपचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा या वेळी उपस्थित होते. ‘डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन’तर्फे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, कार्याध्यक्ष श्याम भुर्के यांच्या उपस्थितीत नागरिकांना दोन हजार रोपांचे वाटप करण्यात आले. ‘गार्डियन डेव्हलपर्स’ यांच्या नांदोशी येथील प्रकल्पावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गार्डियन डेव्हलपर्सचे अध्यक्ष मनीष साबडे या वेळी उपस्थित होते.
‘हरित मित्र परिवार’ व ‘आयडीबीआय बँके’ची शास्त्री रस्ता शाखा यांच्यातर्फे शाखा अधिकारी नरेश बिंदू, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घागरे यांच्या उपस्थितीत बँकेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व ‘रानजाई’ या संस्थेतर्फे हडपसरमधील रामटेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके, ‘राज्य राखीव पोलिस दल गट क्र. २’चे पोलिस उप अधीक्षक एस. जी. काळे, ‘रानजाई’चे अध्यक्ष चंद्रसेन बोऱ्हाडे या वेळी उपस्थित होते.
‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’तर्फे रविवारी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अ‍ॅड. अभय छाजेड या वेळी उपस्थित होते. पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप देखील या वेळी करण्यात आले. ‘पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी’तर्फे अध्यक्ष मंदा चव्हाण, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्या हस्ते मुठा नदीचे जलपूजन करण्यात आले, तसेच सिद्धेश्वर घाटासमोरील नदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण विभागातर्फे नगरसेविका रूपाली पाटील यांच्या हस्ते नागरिकांना पाचशे रोपांचे वाटप करण्यात आले. १५ ऑगस्टपर्यंत ९७६२०२९११० या दूरध्वनी क्रमांकावर एसएमएस पाठवून संघटनेतर्फे नागरिकांना रोप मोफत देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘नमामी चंद्रभागा’ नदी सुधारणा योजनेत संत, समाज, शासन व संशोधकांच्या समन्वयातून गतिमान कार्य व्हावे यासाठी ‘जल बिरादरी’ ही संस्था पुढाकार घेईल आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संघाच्या सहकार्याने हे कार्य पुढे नेले जाईल, अशी माहिती संस्थेतर्फे पर्यावरणदिनाच्या निमित्ताने देण्यात आली.
संस्थेचे महाराष्ट्रातील संघटक सुनील जोशी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन या वेळी उपस्थित होते.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती
There are no sports events and cultural programs in Nagpur here is the reason
नागपुरात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नाही, जाणून घ्या कारण…