News Flash

पुणे- उड्डाण पुलावर साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा तरुणाचा प्रयत्न

ऐनवेळी पोलीस आल्याने मोठा अनर्थ टळला आणि तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले

पिंपरी चिंचवड येथे तरुणाने उड्डाण पुलावर साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ऐनवेळी पोलीस आल्याने मोठा अनर्थ टळला आणि तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. आई-वडिलांना कोण सांभाळणार यावरुन भावासोबत झालेल्या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते. निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

पवन भंडारी असं या तरुणाचं नाव असून त्याचा भाऊ विप्रो कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो. आई-वडिलांना कोण सांभाळणार यावरुन त्याचं भावासोबत भांडण झालं होतं. आई- वडील खेड येथे राहत असून वडील अपंग असल्याची माहिती आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर असणाऱ्या मधुकर पवळे उड्डाण पुलावर ही घटना घडली. साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न होता. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 10:24 am

Web Title: a youngster tried to commit suicide in pimpri chinchwad
Next Stories
1 राममंदिरासाठी वायदा नको; कायदा हवा
2 नव्या आर्थिक वर्षांत करवाढीची शक्यता
3 हुतात्मा मेजर नायर यांना भावपूर्ण निरोप
Just Now!
X