News Flash

हातात कोयता घेऊन १० सेकंदाचा ‘टिक-टॉक’ व्हिडिओ, पिंपरीच्या तरुणाला अटक

त्याच्यावर या अगोदर देखील गुन्हा दाखल असून 'वाढीव दिसताय राव' या लावणीवर कोयता घेऊन व्हिडिओ काढणं त्याला चांगलंच महागात पडल आहे

सध्या सोशल मीडियावर टिकटॉक अॅपचा बोलबाला आहे. याचे लाखो युजर असून अनेकजण आपल्यातील सुप्तगुण यावरील व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. परंतु, टिकटॉक वरील असाच एक व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागला आणि तरुणाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात झाली.

दिपक आबा दाखले (वय-२३ वर्ष) रा. राहटणी पिंपरी-चिंचवड असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर या अगोदर देखील गुन्हा दाखल असून ‘वाढीव दिसताय राव’ या लावणीवर कोयता घेऊन व्हिडिओ काढणं त्याला चांगलंच महागात पडल आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या हाती एक टिकटॉक व्हिडिओ लागला. त्यात ‘वाढीव दिसताय राव लई वाढीव दिसताय’ या लावणीवर आरोपी दीपक हातात कोयता घेऊन घरा बाहेर पडताना दिसत असून, व्हिडिओबरोबरच लावणीही लावली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शहरात वायरल होत वाकड पोलिसांपर्यंत पोहचला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने दिपकचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने आणि गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश माने यांच्या पथकाने केली. कोणी जर अशा प्रकारे दहशद माजविण्याच्या उद्देशाने व्हिडिओ करत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वाकड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 11:37 am

Web Title: a youth arrested at pune due to made tiktok video with chopper
Next Stories
1 नामांकित शाळांतील शिक्षकही अतिरिक्त
2 लालचुटूक चेरीचा हंगाम सुरू!
3 संपूर्ण शहरात गुरुवारी पाणी नाही
Just Now!
X