News Flash

बहुसंख्य आधार केंद्रे बंदच

गेल्या काही दिवसांपासून शहरातील आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे

शहरात सुरू असलेल्या आधार केंद्रांवर सध्या गर्दी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष; शहरात ४१, जिल्ह्य़ात ५२ केंद्रे कार्यान्वित

आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महा ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांना राज्य शासनाकडून सरकारी कार्यालयांचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्य़ात येत्या दोन दिवसांत दोनशे आधार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी जाहीर केले होते. परंतु, आदेश देऊनही अद्याप शहरात केवळ ४१ तर, जिल्ह्य़ात ५२ केंद्रेच कार्यान्वित झाली आहेत, त्यामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप कायम आहे.

जिल्हा प्रशासनांतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये आधार कार्डची नोंदणी बंद झाल्याने आणि टपाल कार्यालयातील यंत्रणा अद्याप सुरळीत न झाल्याने आधार कार्ड नोंदणी काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. मात्र, सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहर आणि जिल्ह्य़ातील दोनशे आधार केंद्रे दोन दिवसांत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी महा ई सेवा केंद्रांना दिले होते. तसेच महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त आधार केंद्रे सुरू करण्यात येणार असून शाळा व अंगणवाडय़ांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आधार यंत्रे उपलब्ध करून दिली जातील, असेही राव यांनी जाहीर केले होते. पुणे महापालिकेच्या पंधरा आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमधील केंद्रे कार्यान्वित करण्याच्या सूचना देऊनही पुणे महापालिकेच्या केवळ हडपसर आणि वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील आणि पिंपरी पालिका भवनमधील आधार केंद्र कार्यान्वित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे. तसेच आधारची जबाबदारी असलेल्या टपाल कार्यालयातही यंत्रणा अद्ययावत करण्याची कामे सुरू असल्याने ‘आधार’साठी पुणेकरांची वणवण सुरू आहे. तसेच प्राप्तिकराचे विवरणपत्र भरताना आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असून त्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आधार नोंदणी कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:08 am

Web Title: aadhar centers closed in pune
Next Stories
1 बाजारभेट : व्यवसायाबरोबरच श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक भान!
2 उर्से टोलनाक्याजवळ २ कोटी ९० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
3 पिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा धुमाकूळ, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह
Just Now!
X