13 December 2017

News Flash

पुण्यातील अब्दुल्ला फकिह ‘सीएस’ परीक्षेत देशात पहिला

कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचे सर्व निकाल सोमवारी जाहीर झाले असून सीएस प्रोफेशनल परीक्षेमध्ये पुण्यातील

प्रतिनिधी, पुणे | Updated: February 26, 2013 1:50 AM

कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचे सर्व निकाल सोमवारी जाहीर झाले असून सीएस प्रोफेशनल परीक्षेमध्ये पुण्यातील अब्दुल्ला रशीद फकिह हा देशात प्रथम आला आहे.
सीएसची परीक्षा डिसेंबर २०१२ मध्ये झाली होती. या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सीएस प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये पुण्याचा अब्दुल्ला रशीद फकिह हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. त्याला या परीक्षेमध्ये ७६.७५ टक्के गुण मिळाले आहेत. सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅममध्ये भिलवाडा येथील अमित नोलाखा हा विद्यार्थी आणि फाऊंडेशन प्रोग्रॅममध्ये लुधियानाची निशा गर्ग ही विद्यार्थिनी पहिली आली आहे.
इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे ही परीक्षा घेतली जाते. सीएसची पुढील फाउंडेशन प्रोग्रॅमची परीक्षा १ जूनला होणार आहे. एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमची परीक्षा २ ते ९ जून या कालावधीमध्ये होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २५ मार्च ही अंतिम मुदत आहे.

First Published on February 26, 2013 1:50 am

Web Title: abdulla fakiha stood first in cs exams