पुणे विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.तरी विद्यापीठाकडे याबाबत १४ हजारापेक्षा जास्त तक्रारी उपलब्ध झालेल्या आहेत. तरी देखील विद्यापीठ प्रशासनाने या बाबत आजपर्यंत स्पष्टीकरण दिले नाही. याच गोष्टीचा निषेध नोंदवत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राडा विद्यापीठात राडा घातला. अभाविपच्या आंदोलकांनी पुणे विद्यापीठ परिसरातले  बॅरिकेडिंगही तोडले.

अभाविपचे महानगरमंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, “आजवर विद्यापीठाच्या कारभारा विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे काम केले आहे. आज पुन्हा विद्यार्थ्याच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन करीत असून आमच्या अनेक मागण्या आहे. त्या बद्दल सांगायचे झाल्यास, पुणे विद्यापीठाकडून विधी शाखेचा पेपर सिस्टीम मधून गायब झाला आहे. तरी तो पेपर कुठे गेला ? या पूर्वी BA.LLB च्या विद्यार्थ्यांना BA तीन वर्षांची पदवी देण्यात येत होती. या वर्षी ती पदवी वगळण्यात का आली आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल असे प्रशासन सांगत आहे. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे?” असे आमचे प्रश्न आहेत.

या प्रश्नांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतेही उत्तर अद्याप पर्यंत दिले जात नाही किंवा पुढे येऊन कोणी बोलण्यास तयार नाही. या विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याला जबाबदार विद्यापीठ प्रशासन असून जोवर, आमच्या खुलासा केला जात नाही. तोवर आमच आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी विद्यापीठ प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.