News Flash

महत्त्वाकांक्षी नदीसंवर्धन प्रकल्पाला गती

शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रकिऱ्या करण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत महापालिकेने कामे हाती घेतली आहेत.

निविदेतील अटी-शर्ती जायका कंपनीकडून मान्य
पुणे : नदीपात्रात थेट मिसळणाऱ्या १०० टक्के  सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिके ने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी नदी सुधार योजनेला (जायका प्रकल्प) गती मिळणार आहे. निविदा प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्याने योजनेचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. या योजनेला अर्थसहाय्य करणाऱ्या जपानस्थित जायका कं पनीने महापालिके च्या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती मान्य के ल्या आहेत. त्यामुळे योजनेचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, असा दावा महापालिके तील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने के ला आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रकिऱ्या करण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत महापालिकेने कामे हाती घेतली आहेत. या प्रकल्पाला केंद्र सरकारने जपानस्थित जायका कं पनीकडून अल्पदराने कर्ज घेतले असून ते अनुदान स्वरूपात महापालिके ला मिळाले आहे. या अंतर्गत शहरात अकरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून शहरात निर्माण होणाऱ्या १०० टक्के  सांडपाण्यावर प्रक्रिया के ली जाणार आहे. हा प्रकल्प १ हजार २०० कोटींचा असून त्यापैकी ८५० कोटींचे अर्थसहाय्य जायका कंपनीने केले आहे.

या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा महापालिके ने के ला आहे. तसेच यापूर्वीही योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. महापालिके ने निविदेच्या अटी-शर्तींमध्ये काही सुधारणा के ल्या होत्या. कामासाठी इच्छुक कं पन्यांनी के लेल्या सूचनांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या सुधारणा मान्यतेसाठी जायका कं पनीकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्याला जायका कं पनीने मान्यता दिली आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

‘पुढील चार आठवडे निविदा भरण्याची मुदत देण्यात आली आहे. निविदा मान्य

के ल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जायका कं पनीच्या नियमानुसार सर्व प्रक्रिया करण्याची तांत्रिक प्रक्रिया पार पाडावी लागली. ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे काम तातडीने सुरू करून मुदतीमध्ये प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य राहिल,’असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:04 am

Web Title: acceleration of jaika project river conservation project akp 94
Next Stories
1 आजीव सभासदत्व मिळवून देण्याच्या बहाण्याने साहित्यप्रेमींची फसवणूक
2 “राज्याचे प्रश्न कोमात आणि स्व:बळाची छमछम जोरात” ; आशिष शेलारांनी लगावला टोला!
3 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत
Just Now!
X