कात्रज-देहुरोड बायपास महामार्गावर भरधाव खासगी बस दुभाजक तोडून विरूद्ध दिशेच्या रोडवरील दोन दुचाकींना धडकली.यात दोन दुचाकीवरील तीन जण जागेवरच गतप्राण झाले तर एकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचाही मृत्यू झाला.
पुणे-बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकात डुक्कर खिंड येथे ही दुर्घटना घडली. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने डिव्हायडर तोडले आणि दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर बससुद्धा उलटली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, यात शंकर तानाजी दिडकर, सारंग तानाजी काळे, चंद्रकांत बाळासाहेब जाधव आणि विनोद कुबेर भारती यांचा समावेश आहे.
अपघातानंतर मार्गावरील वाहने हटविण्यात आली असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.