नगर-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे. शिरूर बाह्यरस्त्यांवरील पाचर्णे मळा येथे कंटेनरला मारुती वॅगन आर कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका परिवारातील चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. किशोर माधव हाके,शुभम माधव हाके, विमल माधव हाके अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात पुष्पा किशोर हाके या गंभीर जखमी झाल्या आहेत .
रविवारी पहाटे तीन वाजता झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये दोन सख्खे भाऊ, एक वीस दिवसांचे बाळ आणि बाळाच्या आजीचा समावेश आहे. मूळचे नांदेड येथील असणाऱ्या किशोर यांना २० दिवसांपूर्वी आपत्य झाले होते. बाळासह आईला पुण्याला घेऊन येताना काळाने घाला घातला. यामध्ये २० दिवसांच्या बाळाला आणि वडिलांनाही आपला जीव गमावावा लागला आहे. या अपघातात आई थोडक्यात बचावली आहे. या अपघाताबाबत शिरूर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 21, 2019 1:39 pm