News Flash

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव कारचा अपघात; १ ठार, ३ जखमी

हे सर्वजण पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडीत राहत होते.

Women died in Chembur , mishap, accident, Women died in Chembur by collapsing tree on her body , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक ठार तर तिघे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. संजय नारायण दाऊतपुरे अस मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना किवळे पुलावर किलोमीटर क्रमांक ९०० येथे भरधाव कारने (एमएच १४ सीएक्स ९०२१) एका अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. यात कारमधील एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. मृत संजय दाऊतपुरे हे मुळचे अमरावतीचे आहेत. भीमराव मस्के, मनोज बंडगर, सचिन साठे अशी जखमींची नावे असून हे सर्वजण पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडीत राहत होते. चौघे मित्र असून ते मुंबईकडे गेले होते. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 10:40 am

Web Title: accident of car accident in mumbai pune express way 1 killed 3 injured
Next Stories
1 पुण्याचे राखीव पाणी उणे!
2 वेगळे राज्य करण्यासाठीच विदर्भाकडे विकासाचा ओघ
3 पाण्याचे मोजमाप करणारी यंत्रणाच नाही
Just Now!
X