मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गावर बोरघाटात बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणारा एक कंटेनर पलटी झाला आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अपघातामुळे दोन मार्गिका बंद असून तिसऱ्या मार्गावरुन धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे. कंटेनर मुंबईच्या दिशेने येत असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर पलटी झाला. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी हा कंटेनर हटवण्याचे काम सुरु आहे. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे.