26 September 2020

News Flash

पुण्यात भीषण अपघात; पुलावरून कार थेट नदीत कोसळली

चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात

मुंबई- बंगळुरू मार्गावर झालेल्या भीषण अपघातात संगणक अभियंता पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना (गुरुवार) आज दुपारी घडली.  या अपघातात राजीव दुबे व वर्षा दुबे  हे दाम्पत्य जखमी झाले आहेत.

मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार थेट पुलावरून  50 फूट खोल मुळा नदी पात्रात कोसळली. मात्र, दैव बलवत्तर असल्याने या भीषण अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. संगणक अभियंता असलेले राजीव दुबे यांची प्रकृती गंभीर असून ते बेशुद्ध आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजीव आणि वर्षा हे दाम्पत्य पुण्यातून वाकडच्या दिशेने मोटारीने (एम.एच-१२ एफ.यु- ४७६४) येत होते. दरम्यान राजीव यांचा मोटारीवरील ताबा सुटला आणि दुभाजक तोडून मोटार पुलावरून थेट नदी पात्रात कोसळली. या भीषण भीषण अपघातात राजीव यांच्या डोक्याला आणि छातीत मार लागला आहे. तर दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे अधिक तपास हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 5:24 pm

Web Title: accident on mumbai bangalore road the car crashed off the bridge msr 87 kjp 91
Next Stories
1 डॉक्टर्स डे : ‘त्या’ दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळालं : डॉ. संजीव वावरे
2 रॅपिड अँटिजेन किटद्वारे एक लाख तपासण्या
3 टाळेबंदीबाबत आदेश आज
Just Now!
X