News Flash

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कंटनेर उलटला, वाहतूक पूर्वपदावर

हा अपघात सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास घडला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (संग्रहित छायाचित्र)

पुण्याहून मुंबईकडे निघालेला कंटनेर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पुलाजवळ उलटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुण्याहून मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. कंटेनर बाजूला करण्यासाठी सकाळपासून प्रयत्न सुरू होते. दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध पडलेला कंटनेर बाजूला करण्यास महामार्ग कर्मचाऱ्यांना यश आले. हा अपघात सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला होता. सुमारे सात तास पुणे-मुंबई मार्ग बंद होता.
अधिक माहिती अशी, पुण्याहून मुंबईकडे जात असलेला कंटेनर सकाळी सहाच्या सुमारास द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पुलाजवळ आल्यानंतर घसरल्याने अपघात झाला. अपघातामुळे ट्रक पुणे-मुंबई मार्गावर रस्त्याच्या मधोमध आडवा झाला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर आडवा झालेला हा कंटेनर बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
अपघातामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. कंटेनर हटवल्यामुळे वाहतूक पूर्वपदावर येत असून धीम्यागतीने वाहतूक सुरू होती. अपघातात जीवितहानी झाल्याची माहिती समजू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 8:21 am

Web Title: accident on mumbai pune express way
Next Stories
1 जन गणरंगी रंगले!
2 दिखावूपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नसतात
3 सूस टेकडीवर पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार
Just Now!
X