23 November 2020

News Flash

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; नादुरूस्त कारला धक्का देताना टेम्पोने उडवले, पाच जण ठार

काही जण बंद पडलेल्या कारला धक्का मारत बाजूला घेत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्या कारला उडवले.

प्रातिनिधीक छायाचित्र

नादुरूस्त कारला धक्का मारताना टेम्पोने दिलेल्या धडकेत तिघे जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास घडला. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ ओम्नी कार बंद पडली होती. कारमधील काही प्रवासी बंद पडलेल्या कारला धक्का मारत बाजूला घेत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्या कारला उडवले. अपघात इतका भीषण होता की यात कारला धक्का मारणारे तिघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला. एकावर अजूनही उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढण्यात आले. अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 8:39 am

Web Title: accident on mumbai pune express way near panvel 3 dead on the spot 3 injured
Next Stories
1 राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत
2 शिवसेनेच्या आमदार-खासदारांचे शीतयुद्ध
3 उन्हाचा कडाका वाढल्यामुळे फळभाज्यांची आवक घटली
Just Now!
X