31 May 2020

News Flash

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बसचा विचित्र अपघात, तिघे जखमी

मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटाजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात व्होल्वोसह तीन बस एकमेकांवर आदळून तिघे जखमी झाले.

| December 26, 2014 11:48 am

मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटाजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात व्होल्वोसह तीन बस एकमेकांवर आदळून तिघे जखमी झाले. खंडाळा घाटात सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या शिवनेरी व्होल्वोला मागून आणखी एका बसने धडक दिली. मात्र अपघाताचे नेमके कारण समजलेले नाही. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई मार्गाववरून वळविण्यात आली होती. वाहतूक पोलीसांनी तातडीने अपघातग्रस्त बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरू झाली. दरम्यान, द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आल्यामुळे लोणावळा परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2014 11:48 am

Web Title: accident on mumbai pune expressway near khandala
Next Stories
1 गजा मारणेची पत्नी आणि नगरसेविका जयश्री मारणेची एसीबीकडून चौकशी
2 पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, वाकडजवळ २० लाख लुटले
3 महापालिकेतील बदल्या कागदोपत्रीच
Just Now!
X