18 October 2019

News Flash

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा अपघात, एकाचा मृत्यू; चार जखमी

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. सीताबाई किसन शिंदे असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शिंदे कुटुंब हे मूळ गावरून मुंबईच्या दिशेने जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किलोमीटर ६० येथे मध्यरात्री कार क्रमांक एम.एच-४३ बी.के-३७४५ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात शिंदे कुटुंबातील सीताबाई किसन शिंदे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. शिंदे कुटुंब हे मूळचे सातारा येथील असून ते कामानिमित्त ठाणे येथे असतात. संबंधित गाडीत तीन महिला आणि दोन पुरुष होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

First Published on April 15, 2019 10:47 am

Web Title: accident on pune mumbai highway