पुण्यातील सदाशिव पेठेत आज मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर ॲसिड हल्ला झाला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास विश्रामबाग पोलीस करीत आहे.

रोहीत थोरात असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिळक रोडवरील बादशाही बोर्डिंग गल्लीमधील स्वप्नगंधा अपार्टमेंटच्या मेन गेट समोर रोहित थोरात हा त्याच्या एका मैत्रिणी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोलत थांबला होता. त्यावेळी सिद्धाराम विजय कुमार कलशेट्टी याने अंगावर अॅसिड फेकले आणि सोसायटीच्या जिन्यावर पळत गेला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर आरोपी सिद्धाराम विजय कुमार कलशेट्टी याने स्वतः वर गोळी झडून घेतली. त्यानंतर तो हल्लेखोरला इमारतीच्या डकट मधून अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढण्यात आले. तर या हल्ल्यात रोहित थोरात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच आरोपी सिद्धाराम विजय कुमार कलशेट्टी याने रोहित थोरात याच्या नेमका कोणत्या कारणावरून हल्ला केला हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही.