News Flash

पिंपरी-चिंचवड : करोना नियम मोडीत काढत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांवर दंडात्मक कारवाई!

हिंजवडी पोलिसांनी केली कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

करोना नियमांचं उल्लंघन करून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन हिंजवडी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले क्रिकेट अकॅडमी असून, तिथे १३ अल्पवयीन मुलं करोना नियामाकडे दुर्लक्ष करून क्रिकेट खेळत होती. या मुलांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली आहे.

देशात करोनाच संकट आहे, महाराष्ट्रात देखील वेगळी काही परिस्थिती नाही. मात्र, अनेक आठवड्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात करोना आटोक्यात येत आहे. परंतु, काही जणांकडून नियमांचा भंग होताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर आज हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले क्रिकेट अकॅडमीमध्ये काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, संबंधित ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके आणि इतर कर्मचारी पोहचले असता तिथे १३ अल्पवयीन मुले क्रिकेट खेळत असल्याचं आढळून आलं. मुलांनी पोलिसांना बघून सैरावैरा धावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना समज देऊन थांबवलं, हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन जाण्यात आलं. तिथे प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करून मुलांना सोडून देण्यात आलं आहे. पुन्हा अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करू नये अशी समज देखील मुलांना देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 8:18 pm

Web Title: action against children who playing cricket in lockdown msr 87 kjp 91
Next Stories
1 पुणे : करोना नियमांचं उल्लंघन करणं हॉटेल चालकास पडलं महागात ; भरला एक लाख रुपये दंड!
2 नव्या वर्षात सामायिक अभ्यास पद्धती!
3 बरे झाल्यानंतरही १०० दिवस काळजीचे!
Just Now!
X