23 September 2020

News Flash

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३६ जणांवर कारवाई, साफ करायला लावला रस्ता

महानगर पालिकेच्या आठ ही प्रभागात कारवाई सुरू आहे

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.याच अंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,उघड्यावर सौच करणे,रस्त्यावर घाण करणे,उघडयावर लघवी करणे यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे अधिकारी कारवाई करत असून ऐकून १४ हजार रुपयांची दंडात्मक करावी केली गेली आहे.यात सार्वजनिक रस्त्यांवर थुंकणाऱ्या ३६ जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून ५ हजार ४०० रुपये दंड वसुल केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात आरोग्य विभागाचे पथक महानगर पालिकेच्या आठ प्रभागात फिरत आहेत.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच रस्त्यावर घाण,उघड्यावर लघवी किंवा उघड्यावर सौच करणाऱ्याला दंड करत आहेत.यात ३६ जणांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने ५ हजार ४०० रुपये दंड केला आहे.तर रस्त्यांवर घाण टाकणाऱ्या ३४ जणांन वर दंडात्मक कारवाई करत ७ हजार ८४० रुपये दंड केला आहे.त्याचबरोबर उघड्यावर सौच आणि लघुशंका करणाऱ्या ६ जणांवर कारवाई करत १ हजार २०० रुपये दंड केला आहे.ही कारवाई सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत महानगर पालिकेच्या आठ ही प्रभागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकने १५० दंड,रस्त्यावर घाण करणे १८० दंड,सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे २०० दंड,उघड्यावर सौच बसने ५०० दंड आहे.अस दंड भरलाच नाही तर पोलिसात यासंबंधी तक्रार दिली जाऊ शकते अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.आरोग्य अधिकारी करत असलेली कारवाई योग्य असून अधिक कडक करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.याच स्वागत सर्व सामान्य नागरिकांकडून केलं जातं आहे.आपला परिसर स्वछ ठेवत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकताना नागरिकांना विचार करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 3:54 pm

Web Title: action for 36 people in public places split
Next Stories
1 ‘बेस्ट प्रॅक्टिसेस इन इन्स्टिटय़ूशन’ अहवालात महाराष्ट्राची आघाडी
2 महापालिकेच्या पाणी वितरणात ३५ टक्के गळती
3 पुन्हा अवकाळी पाऊस
Just Now!
X