अभिनेता आणि मुंबई बॉंबस्फोट खटला प्रकरणात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर आला आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यावरुन बराच वादही झाला होता. त्यानंतर आज (शनिवारी ) तो पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून सकाळी १० वाजता मुंबईला येण्यासाठी रवाना झाला.
संजयची पत्नी मान्यताची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला पॅरोल देण्यात आला आहे. त्यामुळे आता ख्रिसमस आणि नव्या वर्षाची पार्टीचा आनंद संजूबाबाला त्याची घरी घेता येणार आहे. संजयला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला असला तरी फर्लोप्रमाणे ही रजादेखील वाढवता येते. त्यामुळे त्याला आताही एकूण २ महिने घरी राहता येऊ शकते. पत्नी मान्यताची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरुन संजय दत्तला ३० दिवसाची पॅरोलची रजा मंजूर झाली होती. त्यानंतर संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काय झाले, हे कळण्याआधीच संजय दत्त तुरुंगाबाहेर पडला आहे.