04 August 2020

News Flash

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित केला प्रवेश

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी प्रिया बेर्डे यांचे चिरंजीव अभिनय हे देखील उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती.

राजकारणात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच निवड का केली? त्यामाहे काय कारणं आहेत, ते प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे” असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. त्या टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

“मला कलाकारांबद्दल तळमळ वाटतेय. कलाकार तंत्रज्ञानसाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचं पाठबळ मिळत असले तर निश्चित काम करायला आवडेल” असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. अभिनेत्री की, नेता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “मी स्वत:ला कधीही नेता म्हणवणार नाही. मीच नाही, माया जाधव आम्ही सगळेच मिळून एकत्र काम करणार आहोत.

” विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करताय अशी चर्चा आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “असा विचारही माझ्या डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचं आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचं आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांचे समस्या जाणून घ्यायच्या आहेत” असे त्यांनी उत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 3:42 pm

Web Title: actress priya berde joins ncp msr 87 svk 88
Next Stories
1 पुण्यात ‘एन-95’ मास्कच्या दर्जाच्या असलेल्या, ‘एमएच-12’ मास्कची निर्मिती
2 पुणे : शरद पवारांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुबीयांची घेतली भेट
3 खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव रोखणार!
Just Now!
X