राज्य सरकारकडून माहिती; काळाबाजार होऊ नये यासाठी देखरेख

पुणे : सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत असून राज्य शासनाकडे साठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होऊ नये, यासाठी देखरेख सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी, सहकार, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

पुण्यातील शिवभोजन के ंद्रांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काही शिवभोजन के ंद्र आणि स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. स्वस्त धान्य दुकानदार, नागरिक आणि शिवभोजन के ंद्र चालकांशीही त्यांनी संवाद साधताना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहनही के ले.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. जादा दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची सूचना शासकीय यंत्रणांना देण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांचे जनजीवन  विस्कळीत होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून काही ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अन्नधान्याचा काळाबाजार होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांना योग्य ते आदेश देण्यात आले आहेत.