टोल फ्री क्रमांक जाहीर

पुणे : घर किंवा कामाच्या ठिकाणाजवळील आधार के ंद्रांची माहिती आता दूरध्वनीवरून मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याकरिता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिट आयडेंटिफिके शन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) टोल फ्री क्रमांक जाहीर के ला आहे. यापूर्वी नागरिकांच्या तक्रारी आणि आधारची कामे करण्यासाठी पूर्वनियोजित वेळ नोंदवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.

आधार कार्डवरील पत्ता, लिंग, छायाचित्र, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख यांमध्ये दुरुस्तीसाठी किं वा आधार नोंदणीसाठी आधार के ंद्र शोधणे अवघड काम असते. आधार केंद्र शोधले, तरी ते सुरू आहे किं वा कसे?, याबाबत शाश्वती नसते. या कटकटीतून आता नागरिकांची सुटका होणार आहे. यूआयडीएआयने जवळच्या आधार के ंद्रांची माहिती मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांकच जाहीर के ला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधितांना जवळच्या आधार केंद्रांची माहिती, पत्त्याचा तपशील मिळणार आहे.

यूआयडीएआयकडून आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी केंद्र चालकांनी घ्यायचे शुल्क निश्चित के ले आहे. तरी देखील शहरासह जिल्ह्यातील अनेक आधार केंद्रांवर कामे करण्यासाठी जास्तीचे पैसे घेतले जातात. आतापर्यंत नागरिकांना स्थानिक पातळीवर तक्रार करता येत होती. त्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयातही स्वत: जावे लागत होते. मात्र, केंद्र चालकांनी आधारची विविध कामे करण्यासाठी जादा पैसे घेतल्यास यूआयडीएआयकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच आधार नोंदणी आणि दुरुस्ती करण्यासाठी आधार केंद्रांवर नेहमीच गर्दी असते. वेळेत काम होईलच याची खात्री नसते. त्यामुळे यूआयडीएआयने आधारची कामे करण्यासाठी पूर्वनियोजित वेळ नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

तक्रारी, केंद्रांच्या माहितीसाठी एकच क्रमांक

आधार नोंदणी पूर्णपणे निङ्मशुल्क आहे. तसेच आधारकार्डवरील पत्ता, मोबाइल क्रमांक, छायाचित्र, लिंग आणि जन्मतारीख यांमध्ये बदल करण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये, तर बोटांचे ठसे, डोळे स्कॅ न करणे अशा बायोमेट्रिक कामांसाठी प्रत्येकी १०० रुपये अधिकृत शुल्क आहे. या दरांपेक्षा अधिक पैशांची आकारणी केंद्र चालकाने के ल्यास तक्रार करण्यासाठी आणि आता जवळच्या आधार केंद्रांचा तपशील मिळण्यासाठी यूआयडीएआयने १९४७ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.