News Flash

करोना चाचणीनंतर वृद्धाश्रमात प्रवेश

शुक्रवारी जागजी-आरणी रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती  झोपल्याचे पाहून कदम यांनी त्याची विचारपूस केली. 

करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे निर्बंध जरी शिथिल झाले तरी काळजी घेण्यात शिथिलता नको. (प्रातिनिधिक छायाचित्र)

गावोगावी फिरणाऱ्या वृद्धाची परवड थांबली

उस्मानाबाद : अपत्ये सांभाळत  नसल्याने गावोगावी फिरणाऱ्या वृद्ध व्यक्तीस खेड गावाचे सुभाष पाटील यांनी वृद्धाश्रमात भरती केल्याने त्यांची परवड थांबली. खेड येथील पांडुरंग देवबा आवटे (वय ७०) यांना दोन मुले व दोन मुली आहेत. पण वृद्ध पित्याचा सांभाळ करण्यास ते तयार  नसल्याने आवटे गावोगावी फिरत होते.  उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे दोन दिवस मुक्कामी होते. जागजी गावात करोनाचा संसर्ग वाढल्याने १५ मेपर्यंत जनता संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे पोलीस पाटील सुभाष कदम हे दररोज जागजी गावाला भेट देत. शुक्रवारी जागजी-आरणी रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती  झोपल्याचे पाहून कदम यांनी त्याची विचारपूस केली.  तेव्हा त्यांनी सगळी हकीगत सांगितली.  सकाळपासून पाणी, जेवण केले नसल्याचे आवटे यांनी सांगितले. उपसरपंच वैजीनाथ सावंत यांनी  त्यांना  जेवणाचा डबा दिला. नाना भीमराव सावंत यांनीही जेवणाची सोय केली. त्यांनतर  पोलीस पाटील सुभाष कदम व बिभीषण गवाड यांनी  त्यांना बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील वृध्दाश्रमात भरती केले. गौडगाव येथे जाण्यापूर्वी जागजी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. निशा रोकडे यांनी आवटे यांची करोना चाचणी केली. ती नकारात्मक आल्याने मदत करणाऱ्यांनी वृद्धाश्रमाचा पत्ता शोधून त्यांना दाखल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:26 am

Web Title: admission entery to old age home after corona test akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 म्युकोरमायकोसिसच्या भीतीने पुण्यात रेमडेसिविरला अत्यल्प मागणी
2 पिंपरीत करोनास्थिती सुधारली
3 विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा देण्याची अंध विद्यार्थ्यांनाही सुविधा
Just Now!
X