पुणे : जगभरात नावलौकिक संपादन केलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये विधायक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांसाठी यंदाही ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या मंडळांसाठी प्रवेश अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवाची तयारी मंडळांमध्ये सुरू झाली आहे. ठिकठिकाणी उत्सवाचे मंडप उभे राहत आहेत. ही तयारी सुरू असतानाच सार्वजनिक मंडळांचे देखावे अधिक प्रेक्षणीय व्हावेत, त्यातून देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे प्रबोधन व्हावे आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने यंदा गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१९’चे सहप्रायोजक माणिकचंद ऑक्सिरिच हे आहेत. स्पर्धा पॉवर्ड बाय मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस पुणे व पीएनजी सन्स आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुण्यातील सोसायटय़ा अशा तीन गटांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत विजेत्या मंडळांना भरघोस रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. पुण्यनगरीतील सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातूनही नागरिक मोठय़ा संख्येने येतात. त्या दृष्टीने मंडळेही आपला देखावा उत्कृष्ट कसा होईल यासाठी परिश्रम घेतात. अशा उत्तमोत्तम देखावे साकारणाऱ्या मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच पुण्यातील सोसायटय़ांमधील मंडळेही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्याच्या आणि कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ही स्पर्धा होत आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा सविस्तर तपशील आणि प्रवेश अर्ज व अन्य माहितीसाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयात (एक्सप्रेस हाउस, प्लॉट नं. १२०५/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४, दूरभाष- (०२०) ६७२४११४१, ६७२४११४३) येथे दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत संपर्क साधावा.

’  पुणे विभागातील मंडळे आणि सोसायटी विभागासाठी विनायक कोळेकर (९९२२९९००२३) यांच्याशी आणि पिंपरी विभागासाठी अमोल गाडगीळ (९८८१२५६०८२) यांच्याशी संपर्क साधता येईल.

‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१९’ स्पर्धेचे गट आणि पारितोषिकांचे स्वरूप

पुणे विभाग

प्रथम क्रमांक    – २५,००१ रुपये

द्वितीय क्रमांक – १५,००० रुपये

तृतीय क्रमांक    – ९,९९९ रुपये

पर्यावरणपूरक सजावट    – ९,९९९ रुपये

कला दिग्दर्शक   – २,५०१ रुपये

संहितालेखक     – २,५०१ रुपये

सामाजिक जागृती        – २,५०१ रुपये

उत्तेजनार्थ (तीन)        – ५,००१ रुपये

िपपरी-चिंचवड विभाग

प्रथम क्रमांक    – २५,००१ रुपये

द्वितीय क्रमांक – १५,००० रुपये

तृतीय क्रमांक    – ९,९९९ रुपये

पर्यावरणपूरक सजावट    – ९,९९९ रुपये

कला दिग्दर्शक   – २,५०१ रुपये

संहितालेखक     – २,५०१ रुपये

सामाजिक जागृती        – २,५०१ रुपये

सोसायटी विभाग (पुणे शहर)

प्रथम क्रमांक    -९,९९९ रुपये

द्वितीय क्रमांक  – ७,००१ रुपये

तृतीय क्रमांक    – ५,००१ रुपये

उत्तेजनार्थ (चार) – ३,००१ रुपये

पारितोषिक विजेत्या सर्व मंडळांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मंडळांना सन्मानपत्र

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१९

सहप्रायोजक :

माणिकचंद ऑक्सिरिच

पॉवर्ड बाय :

मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस आणि पीएनजी सन्स