पुणे : राज्यातील तंत्रनिके तनांमधील दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) संके तस्थळावर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर के ले असून, विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तंत्रनिके तन अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा होणार नाही. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी तंत्रनिके तन अभ्यासक्रमासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज करणे आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २३ जुलैची मुदत देण्यात आली आहे. तसेच २३ जुलैपर्यंत प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चित करता येईल. २६ जुलैला तात्पुरत्या गुणवत्ता याद्या जाहीर होणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. http://poly21.dtemaharash  या संके तस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तसेच विद्यार्थी सुविधा केंद्रांची यादी, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आदी माहिती संके तस्थळावर देण्यात आली आहे. वेळापत्रक तात्पुरत्या स्वरूपाचे असून बदल झाल्यास त्याबाबत संके तस्थळावर माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.