News Flash

चांदेरे यांच्या दोन मुलांसह चौघांना अटक

बाणेर येथे एका वकिलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह चौघांना चतु:श्रुंगी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

| April 3, 2013 01:35 am

बाणेर येथे एका वकिलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह चौघांना चतु:श्रुंगी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी त्यांना पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
समीर बाबुराव चांदेरे (वय २५), किरण बाबुराव चांदेरे (वय २३, रा. दोघेही- दत्तकृपा निवास, बाणेर), गणेश बाजीराव इंगवले (वय २३) आणि मनोज बाजीराव इंगवले (वय २२,  रा. भूगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत वकील आशिष अर्जुन ताम्हाणे (वय २६, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हाणे हे शिवाजीनगर न्यायालयातील कामकाज संपवून २६ मार्च रोजी घरी जात होते. त्यावेळी बाणेर येथील माउली पेट्रोल पंपासमोर  सायंकाळी सव्वा सहा वाजता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तेव्हापासून आरोपींचा शोध सुरू होता. या चौघांना मंगळवारी अटक केल्यानंतर दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत चौघांना पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान वकिलांवर हल्ला केल्या प्रकरणाचा वकिलांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपींना हजर केले त्यावेळी न्यायालयात वकिलांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. त्याच बरोबर दंगल विरोधी पथकही तैनात करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:35 am

Web Title: advocate beating case sons of chandere arrested
टॅग : Ncp
Next Stories
1 कोथरूडमध्ये ‘एसआरए’चा बोजवारा
2 रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एटीएम फोडून बावीस लाख चोरले
3 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या माहितीतील विसंगतीमुळे १२ अभियंत्याच्या नोकरीवर गदा
Just Now!
X