News Flash

दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर

३०,००० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाने जामीन दिला. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले अॅड. संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून शुक्रवारी (दि.५) जामीन मंजूर करण्यात आला. ३०,००० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाने जामीन दिला आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला सीबीआयने अटक केली होती. संजीव पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली होती. तसेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए)कायद्यानुसार त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 4:03 pm

Web Title: advocate sanjeev punalekar an accused in narendra dabholkar murder case has been granted bail by pune sessions court aau 85
Next Stories
1 धावत्या रेल्वेवर दगड फेकण्याचे प्रकार सुरूच
2 ‘व्यक्तिविशेष’ खंडाचा भाग अभ्यासकांसाठी खुला
3 घाट रस्त्याची रखडपट्टी
Just Now!
X