26 February 2021

News Flash

अल्प गटातील घरे उच्च दराने?

मोरवाडीतील जमीन पूर्वीपासून म्हाडाच्याच मालकीची असल्याने खरेदीची झळ म्हाडाला बसलेली नाही.

मोरवाडीतील ‘म्हाडा’च्या इमारती.

म्हाडाचा दणका; बिल्डरांच्या फायद्यासाठी सामान्यांची लूट होत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

म्हाडाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने पिंपरी-मोरवाडीत अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांसाठी उच्चभ्रू भागातील सदनिकांचा दर आकारण्यात आला असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून सामान्यांची लूट करत बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचा घाट घालण्यात आल्याची तक्रार सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

म्हाडाच्या वतीने मोरवाडी सर्वेक्षण क्रमांक १५०, १५२, १५३ मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ३६२ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ३२९ सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी १५४ अशा एकूण ८४५ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या सदनिकांच्या वाटपाची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या संदर्भात, नगरसेविका सीमा सावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, मोरवाडीतील बांधकामांची तसेच आकारण्यात आलेल्या सदनिकांच्या दराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मोरवाडीतील जमीन पूर्वीपासून म्हाडाच्याच मालकीची असल्याने खरेदीची झळ म्हाडाला बसलेली नाही. या घरांसाठी सरकारने अडीच एफएसआय लागू केला आहे. त्यामुळे म्हाडाने या ठिकाणी सामान्यांना परवडेल, असे दर आकारणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम व्यावसायिकांना फायदा व्हावा, हा हेतू लपून राहिलेला नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकाम असूनही संगनमताने जादा दर आकारण्यात आल्याचा आक्षेप सावळे यांनी घेतला आहे. पिंपळे सौदागर हा शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रतिचौरस फूट सहा हजार रुपये दर आहे.मोरवाडीत कोणत्याही सुविधा नसताना तेथे प्रतिचौरस फूट सहा हजार १०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रतिसदनिका ४७७ चौरस फुटाची असून, त्यासाठी किमान २९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. हा दर परवडणारा नाही. सदनिका विक्रीतून बिल्डर  व राष्ट्रवादीच्या नेत्यांना नफा मिळवून देण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने हा प्रकल्प राबवल्याचे सांगत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 12:44 am

Web Title: affordable group houses at high cost
Next Stories
1 भारत कधीही हिंदू राष्ट्र होणार नाही!
2 मोठी आवक, तरी फुलांच्या दराला ‘बहर’
3 महावितरणच्या चुकीच्या बिलांमुळे नागरिकांना मनस्ताप
Just Now!
X