पुणे : शिक्षणासाठी पुण्यात आलेले अफगाणी विद्यार्थी व्हिसाची मुदत संपल्याने अडचणीत आले आहेत. सध्या पुण्यात असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांपैकी जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची व्हिसाची मुदत संपली असून, शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची, व्हिसाची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानातून जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी भारतात येतात. त्यातील जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थी पुण्यात येतात. पुण्यातील विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) शिष्यवृत्तीअंतर्गत किं वा स्वत:च्या खर्चाने येतात. सद्य:स्थितीत एक हजार चारशे विद्यार्थी पुण्यातील शिक्षण संस्थांशी संबंधित आहेत. त्यातील काही विद्यार्थी अफगाणिस्तानात अडकले आहेत. पुण्यात असलेल्या विद्यार्थ्यांपैकी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा कालावधी आणि व्हिसाचा कालावधी संपुष्टात आला आहे.

संबंधित विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत कु लगुरूंनी लक्ष घालून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेमार्फत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क  साधलेला आहे. विद्यार्थ्यांनी व्हिसासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही.

– डॉ. एन. एस. उमराणी,प्रकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ