News Flash

स्वत:च्या मुलाचा खून करून पुण्यात संगणक अभियंता महिलेची आत्महत्या

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील निखिल गार्डन सोसायटीमध्ये रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

संगणक अभियंता महिलेने स्वत:च्या पाच वर्षे वयाच्या मुलाच्या हाताच्या नसा कापून व गळा दाबून खून केल्यानंतर स्वत: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील निखिल गार्डन सोसायटीमध्ये रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. पत्नी व मुलाच्या मृत्यूमुळे प्रचंड धक्का बसल्याने महिलेचा पती अत्यवस्थ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, कौटुंबिक वादातून आलेल्या निराशेतून तिने हे कृत्य केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अर्णव तेजस मोरे, असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याची आई दीप्ती तेजस मोरे (वय ३४) हिने आत्महत्या केली आहे. मोरे कुटुंब निखिल गार्डन सोसायटीतील ‘ए’ इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती व तेजस मोरे हे दोघेही संगणक अभियंता आहेत. मात्र, दीप्तीने सहा महिन्यांपूर्वी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडली होती. तेव्हापासून ती नैराश्यात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 3:18 am

Web Title: after killing son software engineer lady done suicide
Next Stories
1 हिमानी सावरकर यांचे निधन
2 अवघ्या साडेचार तासात सहा लाख जमले! – दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाउंडेशनला पुणेकरांची मदत
3 अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांचे निधन
Just Now!
X