17 January 2019

News Flash

पत्नीशी भांडण झाल्याने नवविवाहित तरूणाची आत्महत्या

दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता.

प्रातिनिधीक छायाचित्र

पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. श्रावण गोरख कुसाळकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रावण कुसाळकर (वय-२६, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी) याचे पत्नी नीता कुसाळकर बरोबर रविवारी रात्री जोरात भांडण झाले होते. श्रावण हा दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नी नीताला मारहाण करून शिवीगाळ केली होती. हे भांडण ऐकून खालच्या मजल्यावर राहणारी श्रावणची बहीण वर आली आणि तिने नीताला तिच्या घरी घेऊन गेली. मात्र याच भांडणाचा राग मनात धरूण श्रावणने पहाटे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. मृत श्रावण आणि नीताचे दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on February 12, 2018 12:03 pm

Web Title: after quarreling with wife husband committed suicide in nigdi