News Flash

चाकण परिसरातून तीन मुली बेपत्ता

चाकण, महाळुंगे, निघोजे या भागातून एकाच आठवडय़ात तीन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत.

| April 12, 2013 01:47 am

चाकण, महाळुंगे, निघोजे या भागातून एकाच आठवडय़ात तीन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता होणाऱ्या तरुणींचे प्रमाण वाढत असून, त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांचे नातेवाईकही हतबल झाले आहेत.
स्नेहा विकास येळवंडे (वय १८, सध्या रा. निघोजे), पूजा रामनारायण जोशी (वय १८, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) व वैशाली नितीन काळे (वय २०, रा. महाळुंगे इंगळे) अशी बेपत्ता झालेल्या तरुणींची नावे आहेत. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की स्नेहा ही ३० मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निघोजे येथून निघून गेली आहे. पूजा ही महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतून ६ एप्रिल रोजी साडेबाराच्या सुमारास निघून गेली आहे. वरील तरुणींचा अद्याप शोध लागलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:47 am

Web Title: again 3 young girls missing from chakan area
Next Stories
1 मोटारींची मिरवणूक काढून चिखलीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाची सुरुवात
2 ‘टाटा पॉवर क्लब एनर्जी’ कडून ४१ हजार युनिट्स विजेची बचत
3 पुण्यात महात्मा फुलेंची जयंती उत्साहात साजरी
Just Now!
X