News Flash

पाटील इस्टेट झोपडपट्टीत पुन्हा आग; सहा घरं खाक

आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला साधारण तीन महिन्यापुर्वी आग लागुन २०० पेक्षा अधिक घरं जळुन खाक झाली होती.  या भयानक घटनेतून तेथील नागरिक सावरत असतानाच. पुन्हा एकदा याच झोपडपट्टीत काही घरांना  आग लागल्याची घटना घडली  आहे.  या घटनेत सहा घरं खाक झाली आहेत.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये सोमवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, याबाबत माहिती मिळताच काही मिनिटातच अग्निशामक विभागाच्या जवानांनी  घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत सहा घरं खाक झाली होती. त्यानंतर काही वेळामध्ये नऊ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. असा  प्राथमिक अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 11:39 am

Web Title: again fire at patil estate slums
Next Stories
1 मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण, राज्यात वादळी पावसाची शक्यता
2 कचराप्रश्नी निर्वाणीचा इशारा
3 पाणीनियोजनाचा बोजवारा
Just Now!
X