News Flash

मुंबईची हवा दिल्लीप्रमाणे अतिवाईट

मुंबईत बाहेर पडताना प्रदूषणविषयक मास्क वापरण्याचा आणि श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला

(संग्रहित छायाचित्र)

आरोग्यास अपायकारक हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी पुणे शहरामध्ये सध्या ‘उत्तम’ स्थितीत असली, तरी मुंबईत मात्र प्रदूषणाची पातळी दिल्लीप्रमाणे ‘अत्यंत वाईट’ या गटात पोहोचली आहे.

मुंबईत बाहेर पडताना प्रदूषणविषयक मास्क वापरण्याचा आणि श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’ या विभागाच्या दैनंदिन अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

मुंबईच्या हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण   ३११ मायक्रॉनपर्यंत गेले होते. दिल्लीमध्ये ते ३५३ मायक्रॉन इतके होते. त्यामुळे मुंबई आणि दिल्ली ही शहरे सध्या प्रदूषणकारी कणांच्या प्रमाणामध्ये एकाच गटात आहेत.

मुंबईत थंडी

सलग तिसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरातील किमान तापमानात घट झाली. बुधवारपासून मुंबईच्या अनेक भागांत किमान तापमान कमी होऊन २० अंशाखाली गेले. गेल्या चार दिवसात सांताक्रूझ केंद्रावरील किमान तापमानात चार अंशानी घट झाली. तुलनेने कुलाबा येथील किमान तापमानात मोठी घट झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:24 am

Web Title: air in mumbai is as bad as delhi abn 97
Next Stories
1 एक शून्य शून्य आता ‘शून्य’!
2 पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार
3 कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित – उद्धव ठाकरे
Just Now!
X