25 September 2020

News Flash

विकासासाठी सरकारकडून सहकार्य मिळत नाही-अजित पवार

विकासाच्या आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे सरकार आम्हाला शिरुरच्या विकासासाठी सहकार्य करत नाही असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला

विकासाच्या आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे सरकार आम्हाला शिरुरच्या विकासासाठी सहकार्य करत नाही असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. शिरुर या ठिकाणी हल्लाबोल ची सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. शिरुर या ठिकाणी विमानतळ बांधावा म्हणून पाठपुरावा करतो आहोत पण पालकमंत्री गिरीश बापट लक्ष देत नाहीत असेही पवार यांनी म्हटले आहे.

याच सभेत अजित पवार यांनी गॅस दरवाढीवरही टीका केली. सिलिंडरच्या किंमती ८०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. विकास करताना सरकार अशा प्रकारे महागाईला खतपाणी घालते आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 11:29 pm

Web Title: ajit pawar criticized maharashtra government in halla bol
Next Stories
1 सलमानच्या ‘दबंग टूर’दरम्यान विना परवाना गाणी वाजवल्याप्रकरणी गुन्हा
2 पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाला हिरवा कंदील
3 राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपात आणा, गिरीश बापटांचा सल्ला
Just Now!
X