आल्यानंतर नेत्यांना काय-काय करावे लागते, याची प्रचिती िपपरी-चिंचवडकरांना रविवारी आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून शहराच्या कानाकोपऱ्यातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. गृहप्रकल्पांमध्येही ते गेले. काही ठिकाणी ‘श्रीं’ची आरतीही केली. विसर्जन घाटांची पाहणी केली. घाटांवर विसर्जनासाठी आलेल्या गणरायाची पूजाही केली. अजितदादांचे बदललेले रूप प्रथमच पाहिलेल्या नागरिकांना अजितदादांनी निवडणूक अभियान खूपच गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले.

िपपरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शहरातील राजकीय परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादीला असलेला ‘वन वे’ राहिलेला नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण झाले असतानाच आमदार महेश लांडगे यांनीही भाजपची वाट धरल्याने अजितदादांना पुढील धोक्याची कल्पना आली आहे. त्यामुळेच त्यांनी शहरातील घडामोडींकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष दिले असून थेट संपर्कावर भर देण्यास सुरुवात केली, त्याचा प्रत्यय त्यांच्या रविवारच्या दौऱ्यावरून सर्वानाच आला. दुपारी तीनच्या सुमारास ते िपपळे सौदागरला दाखल झाले. नाना काटे यांच्या मंडळास भेट देऊन आरतीही केली. त्यानंतर, रहाटणी, आकुर्डी, प्राधिकरण, तळवडे, चिंचवडगाव आदी भागातील मंडळांना भेटी दिल्या. विविध घाटांची पाहणी केली. प्राधिकरणातील एका सोसायटीतील मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून तिथेही भेट दिली. मंडळांनी जाहीर केलेल्या वेळेनुसार अजितदादा तेथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांना बराच काळ ताटकळत बसावे लागल्याचे चित्र अनेक मंडळांपुढे दिसून आले. काही मंडळांपुढे त्यांनी, उत्सवाचे पावित्र्य राखण्याचे व शांततेने उत्सव पार पाडण्याचे आवाहन केले. प्रदूषण टाळा, सुरक्षितता राखा, पर्यावरणाची काळजी घ्या, निर्माल्य कुंडात टाका, शहर स्वच्छ राखा, ध्वनिप्रदूषण टाळा अशा सूचनाही त्यांनी केल्या. जवळपास २५ मंडळांना भेटी दिल्यानंतर ते पुण्याला रवाना झाले.