राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना व्हायरस ची जास्तच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. लोणावळ्यात एका कार्यक्रमा दरम्यान कार्यकर्त्यांना गंध लावू नका अक्षदा टाका असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. ते लोणावळ्यात एका हॉटेल च्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा त्यांनी असे आवाहन केले आहे.

दरम्यान, आज लोणावळ्यात हॉटेल च्या उदघाटनाला अजित पवार यांनी हजेरी लावली त्या अगोदर हॉटेल परिसरात करोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औषधांची फवारणी करण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोना बद्दल किती धास्ती घेतल्याचे दिसत आहे.

आज लोणावळ्यात एका हॉटेल चे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होते. त्या अगोदर हॉटेल च्या मालकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तसेच परिसरात औषधांची फवारणी करत करोना विषयी जागरूकता दाखवली आहे. दरम्यान, बारामतीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी हस्तांदोलन करणे टाळले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन करणे टाळत असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आज पुन्हा अजित पवार यांनी करोनाची धास्ती घेतल्याचे दिसत आहे.