कोरिया दौऱ्यावर जाताना महापौरांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दौरा खासगी व वैयक्तिक खर्चाने करत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते, अशी माहिती खुद्द पवार यांनीच शनिवारी पत्रकारांना दिली.
महापालिका पदाधिकाऱ्यांचा कौरिया दौरा वादग्रस्त ठरला असून त्याच्या चौकशीचे आदेश नगरविकास विभागानेही आयुक्तांना दिले आहेत. दौरा खासगी असल्याचे सांगून जरी पदाधिकारी दौऱ्यावर गेले, तरी प्रत्यक्षात त्यांचे कुटुंबीय मात्र स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून दौऱ्यात सहभागी झाले होते. त्याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, हा दौरा खासगी असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. ते स्वत:च्या पैशांतून जाणार असल्याचेही मला सांगण्यात आले होते. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे.