कोल्हापूरमधील टोलनाके बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी बारामतीमधील टोलचा विषय विधानसभेत उपस्थित केला. कोल्हापूरमधील टोलनाके ज्या प्रमाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसाच बारामतीमधील टोल पण रद्द केला पाहिजे, तो कधी करणार, असा सवाल अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारला.
ते म्हणाले, कोल्हापूरमधील अंतर्गत रस्त्यावरील टोल सरकारने रद्द केला. बारामतीमध्ये कोल्हापूरप्रमाणे अंतर्गत रस्त्यांवर टोल आकारला जातो. कोल्हापूरप्रमाणे बारामतीमध्येही टोल रद्द केला पाहिजे. तो कधी करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.
त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरमधील टोल रद्द करण्यामागे आंदोलनाचा प्रचंड रेटा होता, हे सर्वांना माहिती आहेच. बारामतीमध्येही असेच आंदोलन झाल्यास सरकार विचार करेल.