12 December 2019

News Flash

सरकारचा निधी : नाटय़ परिषद उपाशी; साहित्य महामंडळ तुपाशी!

राज्य सरकारने जाहीर केलेला निधी पदरामध्ये पाडून घेण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला यश आले आहे.

| March 29, 2015 05:13 am

राज्य सरकारने जाहीर केलेला निधी पदरामध्ये पाडून घेण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला यश आले आहे. तर, नाटय़संमेलन होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद उपाशी राहिली आहे.
घुमान येथे होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या अनुदानाची साहित्य महामंडळाची प्रतीक्षा संपली आहे. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश बुधवारी महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान,  धनादेश न मिळाल्याने नाटय़ परिषद मात्र उपाशी आहे.
बेळगाव येथे झालेल्या नाटय़संमेलनासाठी विशेष बाब म्हणून राज्य सरकारतर्फे अनुदानाच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याची घोषणा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. नाटय़संमेलनाला धावती भेट देण्यास गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुदानाची रक्कम तातडीने मिळेल, असे जाहीर केले होते. मात्र, नाटय़ परिषदेच्या हाती रक्कम पडली नाही.

First Published on March 29, 2015 5:13 am

Web Title: akhil bhartiya marathi sahitya sammelan ghuman
Just Now!
X