News Flash

आळंदी पोलिसांनी घडवली आई-मुलीची भेट; खाकीतल्या माणुसकीची कहाणी

तीन तासांत घेतला आई वडिलांचा शोध

पोलिसांनी सुखरुपपणे  तिला आई वडिलांच्या ताब्यात दिलं.

सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारे, माणुसकी नसलेले अशा नजरेतून नागरिक अनेकदा पोलिसांकडे पाहत असतो. मात्र आळंदीमधील एका घटनेमुळे खाकी वर्दीतील कार्यक्षमता आणि माणुसकीची दुसरी बाजू समोर समोर आली आहे. यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. आळंदी पोलीस आणि दामिनी पथकाने एका दहा वर्षांच्या मुलीची तिच्या आई वडिलांशी भेट घडवून आणली.

दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेलं आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणेच हे पथक सकाळी सातच्या सुमारास आळंदीच्या बस स्थानकाच्या परिसरात गस्त घालत होते. पथकातील महिला पोलीस नाईक आशा घारे, ससाणे आणि बिट मार्शल हवालदार क्षीरसागर यांना भटकत असलेली दहा वर्षांची मुलगी दिसली. मुलगी इतकी घाबरुन गेली होती की, या मुलीला स्वत:चे नाव सांगता येत नव्हते, तसेच तिच्याकडून तिच्या आई-वडिलांविषयी कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. पण तिच्या तोंडून मोशी हे शब्द ऐकून पोलिसांनी मोशीचा काना कोपरा एक करत तीन तासांत या मुलीच्या आई वडिलांना शोधून काढले. काजल असं या मुलीच नाव असून पोलिसांनी सुखरुपपणे  तिला आई वडिलांच्या ताब्यात दिलं. काजलचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 7:59 pm

Web Title: alandi damini police scod 10 years old girl safe delivered home
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये अज्ञाताने नवी कोरी मोटार पेटवली
2 स्वच्छतागृहांवर हातोडा नको!
3 सहा महिन्यांच्या अभ्यासातून ब्रह्मणस्पती मंदिर साकारले
Just Now!
X